अर्थ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
उदाहरणे :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
समानार्थी : कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
अर्थ : कानभर घालायचे एक कानातले.
उदाहरणे :
तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.
अर्थ : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
उदाहरणे :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
समानार्थी : कर्ण
अर्थ : उचलता यावे म्हणून धरण्यासाठी बाहेरच्या बाजूस असलेला भांड्याचा भाग.
उदाहरणे :
कपाचा कान तुटला.
अर्थ : दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक.
उदाहरणे :
बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.
अर्थ : ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक.
उदाहरणे :
बैलगाडीच्या धुर्याची खीळ कानातून निघाली.
कान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaan samanarthi shabd in Marathi.